भारतीय रेल्वे वेळेवर का येत नाही ?
"प्रवाश्यांनो कृपया लक्ष द्या, भारतीय रेल नेहमीप्रमाणे उशीरा येईल. तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हाला कुठलीही खंत नाही,याची सर्वांनी नोंद घ्यावी." आता असा संदेश रेल्वे स्थानकांवर वाजवायला पाहिजे. काही अपवाद सोडले तर कुठलीही रेल्वेगाडी वेळेवर येत नाही. जग वेगात पुढे जात असताना आपण सुस्तपणे प्लेटफार्मवर नुसतेच थांबून आहोत. वेळेचे महत्व जपानकडून शिकायला हवे. तिथे अर्धाही मिनीट उशीर झाला तर संबंधित व्यक्तीद्वारे प्रवाश्यांची माफी मागितली जाते. भारतीय रेल्वे मात्र प्रवाशी हे बिनकामाचे आहेत, असे गृहीत धरून त्यांच्या त्रासाबद्दल कधीच दखल घेताना दिसत नाही. पाच दहा मिनिटाचा उशीर तेही अत्यावश्यक कारणांमुळे होत असेल तर ते ग्राह्य आहे, पण कर्मचाऱ्यांच्या वेळखाऊ स्वभाव, सेवाभावाचा अभाव आणि सेवेप्रती गंभीर नसल्यामुळेच रेल्वे वेळेवर धावत नाही. निर्धारीत वेळेपेक्षा दहा मिनिट उशीरा येणाऱ्या गाडीची वाट पाहत रेल्वेच्या बाकावर मी बसून आहे. पण दहा मिनिटे झाली, अर्धा तास झाला तरी येणाऱ्या गाडीला प्लेटफार्मच मिळत नाही. आता तीच गाडी सव्वा तास उशीरा येईल म्हणून रेल्वेकडून प्रदर्शित केल्या जात...