हिटलर....कसा घडला आणि बिघडला ? (भाग २)
हिटलर....कसा घडला आणि बिघडला ? (भाग २)
परिस्थितीने गांजलेला, जन्माने जर्मनीचा नसणारा एक सामान्य तरुण क्रुर हुकूमशहापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याचा हा प्रवास अत्यंत विस्मयकारी असाच आहे. संपूर्ण जगाला ज्याच्याबद्दल गुढ भिती व उत्सुकता होती, त्या हिटलरने जर जगावर युध्दजन्य परिस्थिती ओढवली नसती तर....तर तो एक हिरो झाला असता. जर्मनीचा महानायक. पण तसे घडले नाही हे जर्मनीचे तथा साऱ्या जगाचेच दुर्दैव.
बालपण ते तरुण
आपल्या आयुष्याला वळण लावणाऱ्यांत आई वडीलांचे स्थान फार मोठे असते. हिटलरच्याही आयुष्यातील विविध छटांपैकी आई - वडील हे महत्वाचे केंद्रबिंदू आहेत. हिटलरचे वडील कडक स्वभावाचे. त्यांच्या स्वभावाचा फटका अनेकदा लहान हिटलरला बसायचा. वयाच्या पासष्टाव्या वर्षी हिटलरचे वडील अॕलाॕईस हिटलर यांचे निधन झाले. वडीलांच्या निधनानंतर घरचा मोठा असल्याने कुटुंब प्रमुखाची जबाबदारी हिटलरकडे आली. हिटलरचे वडील सरकारी नोकरीत असल्याने मृत्यूनंतर घरच्यांना पेन्शन सुरू झाली. सांपतिक स्थिती बरी होती. हिटलर वसतिगृहात राहायला गेला. तो तांत्रिक शिक्षण घेत होता. वसतिगृहात हिटलर एकलकोंडा म्हणून प्रसिद्ध होता. तो चित्र काढण्यात वेळ घालवायचा. एक आळशी व गावंढळ मुलगा अशी त्याची तिथे ओळख होती. असे असले तरी तो बोलण्यात पटाईत होता. चुकीचे बोलायचा, पण ते तर्कशुद्ध असायचे. त्यामुळे हिटलरचे बोलणे आवडीने ऐकलेही जायचे. इतिहास विषय हिटलरचा आवडीचा विषय होता. जर्मन विरांच्या कर्तृत्वाचा इतिहास ऐकायला त्याला फार आवडायचे. बालपणापासूनच राष्ट्राबद्दलचे उत्कट प्रेम त्याच्या अंगी भिनले होते. त्याचा अभ्यासाकडे कमी तर कलेकडे जास्त ओढा होता.
पुढे लिंझमच्या शाळेतून नाव काढून त्याचे दुसऱ्या शाळेत नाव टाकले. तिथे अनेक विषयात नापास झाला. पुढील परीक्षेत सुधारणा झाली. पदवी मिळवण्यासाठी एक परिक्षा देणे गरजेचे होते, पण त्याच काळात त्याला आजाराने पछाडले. फुप्फुसातून रक्त पडू लागले होते. तब्बेत बरी झाल्यावर त्याने परीक्षा दिली. हिटलर पास झाला. पुढील शिक्षण मात्र त्याने घेतले नाही. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने शाळा सोडली. वाचनाची आवड मात्र त्याने जपली. शाळा सोडल्यानंतर हिटलरने कामधंदा करावा, अशी आईची इच्छा होती. पण कोणाच्या हाताखाली काम करणे हिटलरला मान्य नव्हते. आपली मनमानी तो करत राहीला. आता वडलांचाही धाक नव्हताच. भटकणे आणि कलावंत बनण्याची स्वप्न बघणे हे त्याचे आवडते काम बनले. अशातच त्याची कुबिजेक नावाच्या मुलाशी मैत्री झाली. तो त्याचा एकुलता एक मित्र. हिटलर त्याच्यापुढे तावातावाने भाषण देताना तो शांतपणे ऐकत असे. कुबिजेक शिवाय स्टेफानी नावाची मुलगी हिटलरला आवडायची. हिटलर लाजरा होता. त्याने स्टेफानीवर अनेक कविताही लिहिल्या, पण त्या दाखवण्याची हिंमत त्याच्याकडे नव्हती. आपल्या मनातले तो आपला मित्र कुबेजला सांगत असे. स्टेफानीविषयी सुध्दा त्याने सांगितले. हिटलर आपल्यावर प्रेम करतो याची मात्र स्टेफानीला जराशीही कल्पना नव्हती. त्याचे गुप्त प्रेम होते. हिटलर दुरूनच तिच्यावर प्रेम करीत होता. प्रेमाचा हा हळवा कोपरा सांभाळत हिटलर १९०६ मध्ये पहिल्यांदा व्हिएना या राजधानीत गेला. हिटलरला चित्रकलेत जास्त रसा होता. व्हिएना ललित कला अॕकॕडमीमध्ये प्रवेश मिळावा, अशी त्याची मनापासून इच्छा होती. त्यासाठी त्याने परिक्षाही दिली, परंतू तो नापास झाला. परीक्षकांना त्याची चित्रे आवडली नाहीत. परिणामतः त्याला अकादमीत प्रवेश मिळाला नाही. अत्यंत दुःखी मनाने तो घरी परतला. इकडे आई शेवटच्या घटका मोजत आहे. हिटलर चहूबाजुने दुखात वेडला गेला. हिटलरच्या आईला कॕन्सर झाले होते. ती दिवसेंदिवस खंगत चालली होती. या प्रसंगाला हिटलर धिराने सामोरे गेला. तो आईची नीट काळजी घेत होता. तो दुःखी अंतःकरणाने आईच्या वेदना बघत होता. शेवटी २१ डिसेंबर १९०७ रोजी अॕडाॕल्फ हिटलरच्या आईने जगाचा निरोप घेतला. आईच्या मृत्यूनंतर त्याची अवस्था फार वाईट होऊ लागली. आता कष्टाचे जगणे त्यास जगावे लागत होते. परिस्थितीसोबतच हिटलरचा स्वभावही हळूहळू बदलत चालला होता. हिटलर एकटा राहू लागला होता. त्याच्याजवळील पैसे संपत चालले होते. आता भिक्षा मागण्याशिवाय पर्यात नव्हता. त्याने भिक्षाही मागितली. हे सर्व असह्य होऊन शेवटी तो अनाथाश्रयात जाऊन राहिला. तिथे काही वर्षे काढली. तो छोटे मोठे काम करत, प्रसंगी हमालीही करत तर कधी स्वतः रंगवलेली पोस्टकार्ड विकून दिवस काढीत राहिला.
हिटलरचे आयुष्य असे साधे सरळ पुढे जात असताना तो एकढा क्रुर झाला कसा ? हा प्रश्न नेहमी सतावतो. तो सत्तेच्या प्रवाहात वाटेल तिकडे वाहवत गेला ? अति महत्वकांक्षेचा तो बळी ठरला ? की मानसिक स्वास्थ ढळल्याने तो असंबंध वागू लागला ? अॕडाॕल्फ हिटलर याचे आयुष्य विविध प्रश्नांनी व्यापलेले आहे. त्याच्या आयुष्यातील घटनांचा मागोवा घेतला तर या उत्तरांचा शोध लागू शकतो (क्रमशः)
👤 अरुण व्ही. लाडे

Comments
Post a Comment