हिटलरः कसा घडला आणि बिघडला ? (भाग १)
हिटलरः कसा घडला आणि बिघडला ?
हिटलर....एक क्रुरकर्मा, लाखो लोकांची हत्या करवणारा खूनी, संपूर्ण जगाला महायुद्धात लोटणारा युध्दप्रेमी, आपल्या जैविक गुणांविषयी अति प्रेम असणारा असे किती तरी आरोप हिटलरवर करण्यात आले आणि ते सत्यही असतील. हिटलरचे व्यक्तीमत्व या आरोपांना पुरून उरते. कारण आजही अनेकांत त्याच्या आयुष्याविषयी अमाप उत्सुकता पहायला मिळते. त्याने केलेले नरसंहार कदापि समर्थनीय होऊ शकत नाही. पण तो असा का वागला यासंदर्भात जाणून घेणे एक वाचक व अभ्यासक म्हणून जिज्ञासेला आवाहन करणारे ठरते.
हिटलरच्या आयुष्यातील सुरुवातीचा काळ अतिशय सामान्य असाच होता. अगदी दुर्लक्षित. कलाप्रेमी असणाऱ्या हिटलरला वास्तुशिल्पकार व्हायची इच्छा होती. त्याचा जन्म आस्ट्रियातील. तो व्हीएनात अनेक वर्ष वास्तव्याला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने शाळा सोडली. आपला चरीतार्थ चालवण्याकरीता तो पोस्टकार्ड रंगवून पर्यटकांना विकत असे. वडीलांची त्याला कसलीही मदत नव्हती. त्याच्या व्यक्तीमत्वातील हा एक महत्त्वाचा कोपरा आहे. आपले बालपण व तरुणपण कुठल्या परिस्थितीत गेले आणि त्याकाळात तुमच्यावर कोणत्या विचारांचा प्रभाव पडला, हे पुढील आयुष्याला दिशा देणारे ठरते. पुढे त्याच्याजवळील पैसे संपले तेव्हा तो निराधार लोकांच्या कँपमध्ये राहू लागला. येथे तो अंतर्बाह्य बदलला. तो १९१३ मध्ये जर्मनीतील म्युनिच येथे गेला. हिटलरने पहिल्या महायुद्धात बव्हेरीयन सैन्यात नोकरी केली, त्याने फ्रान्स व बेल्जियम येथे आपली सेवा दिली. तो गोळीबारात जखमीही झाला होता, पण त्याच्या कामगीरीबद्दल त्याला कुठलेही शासकीय पदक मिळू शकले नाही, कारण तो जर्मनीचा पूर्ण नागरिक नव्हता. पहिले महायुद्ध संपले, मात्र तो सैन्यातच कायम राहिला. त्याच्यावर राष्ट्रीय विचारसरणीचा प्रचार करण्याचा आगळा वेगळा काम सोपवला गेला. येथूनच तो ज्यूविरोधी म्हणून उदयास आला. ज्यूंमुळेच जर्मनीवर युध्द लादले गेले, हे राजकीय गटाना पटवून देण्याचे काम त्याच्यावर सोपवले होते आणि त्याने ते आपल्या वक्तृत्वाद्वारे पूर्णही केले. त्याने वक्तृत्वालाच शस्त्र केले. त्याचा त्याने यथोचित वापर केला. त्याच्या भाषणांना गर्दी वाढू लागली. त्याला व त्याच्या राष्ट्रीय विचारांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळू लागला. तो National socialist german workers party चा नेता बनला.
पहिल्या महायुद्धात पिचून निघालेला जर्मनी पुढे जागतिक मंदीमुळे अधिकच आर्थिक अडचणीत सापडला. हिटलरची प्रसिद्धी पाहता पार्टीने त्याला पक्षाचे एक पद दिले. आपसूकच त्याला जर्मन नागरिकत्वही मिळाले. तो जर्मनीचा Chancellor झाला. नाझी पक्ष आता जर्मनीचा सर्वेसर्वा बनला. येथून जर्मनीत हिटलरची हुकूमशाही सुरू झाली. त्याने पायाभूत सुविधांवर भर देऊन त्यात सुधारणा घडवून आणल्या. पहिल्या महायुद्धानंतर निपचित पडलेल्या जर्मनीच्या आत्मविश्वासाला हिटलरने उंच भरारी प्राप्त करु दिली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. आता तो जर्मनीला महान बनवण्याच्या नादात जगालाच नियंत्रित करू पाहत होता. याचे संपूर्ण जगाला परिणाम भोगावे लागले. हिटलरने सर्वप्रथम पोलंडवर हल्ला केला. हिटलरची ताकद पाहता कुठलाही देश मध्ये पडला नाही. पुढे त्याने नेदरलँडवर आक्रमण केले. यावेळी फ्रान्स नेदरलँडच्या मदतीला आला, पण जर्मनीपुढे त्याचा टिकाव लागू शकला नाही. आपल्या अतिमहत्वकांक्षेची पूर्तता करण्यासाठी तो एकेक देश काबीज करु लागला. त्याला जापान येऊन मिळाला. आणि एक मोठी शक्ती निर्माण झाली. जर्मनीच्या आक्रमक धोरणामुळे संपूर्ण जगावर राज्य करणारा इंग्लंडही हादरला होता. अशावेळी अमेरिका युध्दात ओढला गेला. दुसऱ्या महायुद्धाची भयानकता इतिहासालाही धडे देणारी आहे. या महायुद्धात १ कोटी १० लाख लोकांना प्राण गमवावे लागले. अनेक पातळ्यांवर लढल्या गेलेले हे युध्द अखिल विश्वातील सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा अनेक क्षेत्रांत बदल घडवून आणले. आणि या सर्वांच्या मुळाशी होता #Adolf Hitler. (क्रमशः)
👤 अरुण व्ही. लाडे

Comments
Post a Comment