कडाक्याची थंडी (कविता)

कडाक्याची थंडी

कडाक्याची थंडी
सवे पेटती चूल
तुझ्या रुपाची सखे
मज पडली भूल.

कडाक्याची थंडी
हवे गोधळी पांघरूण
खाटेवरी पडलं
तुझ्या रुपाचं चांदणं.




कडाक्याची थंडी
मळा फुलला जोमात
तुझ्या संगतीने सखे
जोश वाहतो रोमात

कडाक्याची थंडी
तू उबदार दुलई
या उघड्या राती
वाजे प्रेमाची सनई

या उघड्या राती.....
👤 अरुण व्ही. लाडे

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....