तू ये बरसात होऊन

तू ये बरसात होऊन

माझ्या बंजर झालेल्या जमीनीत
ओत पहिल्या नजरेचं पाणी

आणि उगव प्रितीचं फूल.
भेगाळलेल्या भावनांवर
हळूच फिरव तुझा हात,
तुझ्या आपुलकीचा निचरा
होऊ दे माझ्या अंतर्मनात.
सखे, तू बरसात होऊन ये
आणि
माझ्या आयुष्याचा कोपरा न् कोपरा
चिंब करुन टाक....

                   👤अरुण व्ही. लाडे
                      दि. १३/०६/२०१७



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थ्यँक यु JAIPAN !

भारतीय रेल्वे वेळेवर का येत नाही ?

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं