काळोख अन् दिपस्तंभ
काळोख अन् दिपस्तंभ
घुसमटलेल्या रात्रीचे पांघरूण
पार फेकून द्यावे रात्रीच्याच पोकळीत
सूर्याला जागवून आकाशाला जवळ करत
भटकून यावे दूर क्षितिजापर्यंत.
करकच्च मिठीत अंधार
आवळून ठेवतो रात्रीच्या खाटेवर
अंधारपाश तोडून
मिणमिणत्या उजेडाला साद घालत
पसरावे अंतर्बाह्य.
काळोखाच्या गुहेत
आंधळा प्रवास ऊर फोडणारा
उजेडाचे सारेच दारं बंद होताना
मेंदूचा भव्य समुद्र सांगतो,
काजव्याचाही क्षुद्र टिंब
दिपस्तंभ होऊन जातो काठ गाठायला.
अंधाराशी पैज लावावी
अन् उजेडाने आपले घोडे दामटावे
पार उधळून टाकावे अंधारगर्व
त्यास दाखवावा आरसा
तो स्वतःच गळून पळेल
पिकल्या पानासारखा कायमचा....
👤 अरुण व्ही. लाडे
दि. २४ मे २०१९
घुसमटलेल्या रात्रीचे पांघरूण
पार फेकून द्यावे रात्रीच्याच पोकळीत
सूर्याला जागवून आकाशाला जवळ करत
भटकून यावे दूर क्षितिजापर्यंत.
करकच्च मिठीत अंधार
आवळून ठेवतो रात्रीच्या खाटेवर
अंधारपाश तोडून
मिणमिणत्या उजेडाला साद घालत
पसरावे अंतर्बाह्य.
काळोखाच्या गुहेत
आंधळा प्रवास ऊर फोडणारा
उजेडाचे सारेच दारं बंद होताना
मेंदूचा भव्य समुद्र सांगतो,
काजव्याचाही क्षुद्र टिंब
दिपस्तंभ होऊन जातो काठ गाठायला.
अंधाराशी पैज लावावी
अन् उजेडाने आपले घोडे दामटावे
पार उधळून टाकावे अंधारगर्व
त्यास दाखवावा आरसा
तो स्वतःच गळून पळेल
पिकल्या पानासारखा कायमचा....
👤 अरुण व्ही. लाडे
दि. २४ मे २०१९
Comments
Post a Comment