चारोळी....

आपल्याच सावलीला
सोडून जातोस कसा तू
भुतांच्या दावनीला
मला बांधतोस कसा तू...


++++

माझेच मला कधी
गावले नाही वितभर
प्रेतांच्या टाळुंवरची
ते लोणी खाती रितसर....


++++

खंत नको ती
क्षणाचीही उसंत नको
रोजच्या मरणाला
जीवनाचे रवंथ नको...


++++

नको चांदने नको तारका
नकोत मजला रात काजवे
तू असशी दूर जरीही
भास तुझे ही रात्र जागवे.


++++

आम्ही कधीच केली नाही पर्वा
जीवापासून तिच्यावर प्रेम केले
घातकीच ठरली साथ तिची
तिने काळजावर वार खोल केले.

                   👤 अरुण व्ही. लाडे 

Comments

Popular posts from this blog

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट

तू रोज येतेस.....