पंचनामा
पंचनामा
उजाडलेल्या झाडावरती
थवा पक्षांचा बसावा
झाडाची फांदीन् फांदी
तेव्हा मोहरुन यावी आनंदाने
अन् त्या निष्पर्ण फांदीलाही
फुटावा मायेचा ओलावा
तसंच...,
दूरवरुन सरकारी अधिकाऱ्याला येताना बघून
पारावर बसलेला शेतकरी तरारुन उठतो
या मरत्या पिकाचा होणार आता पंचनामा
अन् मिळेल भरपाई
म्हणून सरकारी अधिकारी त्या पक्षासारखा भासतो.
वाळक्या फांदीला पालवी फुटावी तसं
झाड हिरवाकंच होतो त्याच्या डोळ्यात.
पंचनामा होतो पिकाचा, शेतकऱ्याच्या आशेचा
मग कागदाच्या चार ओळीत तो पडून राहतो
पुढचा पिक येईपर्यंत.....
शेतकरी आता आपल्याच मरणाच्या पंचनाम्याची
वाट बघतोय
दूरवर त्याची नजर शोधत असते
एका सरकारी अधिकाऱ्याला.....
एका सरकारी अधिकाऱ्याला.....
अरुण व्ही. लाडे
उजाडलेल्या झाडावरती
थवा पक्षांचा बसावा
झाडाची फांदीन् फांदी
तेव्हा मोहरुन यावी आनंदाने
अन् त्या निष्पर्ण फांदीलाही
फुटावा मायेचा ओलावा
तसंच...,
दूरवरुन सरकारी अधिकाऱ्याला येताना बघून
पारावर बसलेला शेतकरी तरारुन उठतो
या मरत्या पिकाचा होणार आता पंचनामा
अन् मिळेल भरपाई
म्हणून सरकारी अधिकारी त्या पक्षासारखा भासतो.
वाळक्या फांदीला पालवी फुटावी तसं
झाड हिरवाकंच होतो त्याच्या डोळ्यात.
पंचनामा होतो पिकाचा, शेतकऱ्याच्या आशेचा
मग कागदाच्या चार ओळीत तो पडून राहतो
पुढचा पिक येईपर्यंत.....
शेतकरी आता आपल्याच मरणाच्या पंचनाम्याची
वाट बघतोय
दूरवर त्याची नजर शोधत असते
एका सरकारी अधिकाऱ्याला.....
एका सरकारी अधिकाऱ्याला.....
अरुण व्ही. लाडे
Comments
Post a Comment