झुंड - नाम ही काफी है.
झुंड - नाम ही काफी है. बहुचर्चित तथा बहुप्रतिक्षित "झुंड" हिन्दी चित्रपट ४ मार्चला भारतभर प्रदर्शित झाला. नागराज मंजुळेचा चित्रपट म्हणजे नवे काही असेलच अशी प्रेक्षकांची भावना असते. प्रेक्षकांची ही अपेक्षा नागराजने पूर्ण केली आहे. नागपूर येथील प्रा. विजय बारसे यांनी फुटबालद्वारे झोपडपट्टीतील मुलांचे आयुष्य बदलवले. त्यांनी स्लम साॕकर नावाची संस्था स्थापन केली. या माध्यमातून त्यांनी झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या मुलांसाठी फुटबाल या खेळाचे मंच उपलब्ध करून दिले. त्यांना वाईट व्यसनाकडून खेळाकडे आकर्षित केले. झुंड हा चित्रपट प्रा. बोरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. झोपडपट्टी म्हटले की सर्वसामान्य लोकांचा दृष्टिकोन बहुतेक वाईटच असतो. येथे नशा करणारी, चोऱ्या व मारामारी करणारी मुलं असतातही, पण त्यामागील कारणांचा शोध कोणी घेताना दिसत नाही. झोपडपट्टी ...