हिटलर....कसा घडला आणि बिघडला ? (भाग ३)

हिटलर याने जे भोगले ते व्यक्तीमत्वाला धारदार बनवणारे होते. त्याने ग रीबीचे चटके सहन केले, रागीट वडीलांचा त्रासही भोगला. आईचा आजार जवळून पाहताना तो अधिक हळवाही झाला. पोरकेपण त्याच्या वाट्याला आले. या सगळ्या प्रसंगांना तो एकट्याने सामोरे गेला. या सर्वांचा परिणाम त्याच्या व्यक्तीमत्वावर झाला. तो अधिक कठोर झाला. त्याच्या वागण्याला कसलीच मर्यादा नव्हती. त्याचा कुणी विरोध केला तर त्याला सहन होत नसे. त्याला जे अनुभव आले, त्यातून तो आपले विचार, दृष्टिकोन ठरवू लागला. त्याच दृष्टिकोनातून तो इतरांकडे पाहू लागला. पुढील व्यक्ती जर त्याचा विरोधी असला तर त्याला खाऊ की गीळू असे त्याचे झाले होते. आपलेच खरे, असे एकदा ठरवले तर दुसऱ्यांचे म्हणणे कितीही योग्य असले तरी ते आपल्यासाठी अयोग्यच असते. अॕडाॕल्फ हिटलरचेही नेमके तसेच झाले होते. तो स्वतःच्याच खास नजरेतून जगाला पाहत होता. ज्यूंचा विरोध हिटलरला वाचनाचा नादच होता. जर्मन इतिहासासोबतच अनेक विचारवंता...