थ्यँक यु JAIPAN !
थँक यु jaipan ! तब्बल अठरा वर्षानंतर तिची साथ सोडावी लागली. काही काळ घरचे वातावरण थोडेसे दुःखी, थोडेसे हळवे झाले. तिने अनेक आनंदाच्या प्रसंगी आम्हाला भक्कम साथ दिली. आपल्या गोड आवाजात घरात आनंद पसरला. तिनेच प्रत्येक रविवार खास केला. तिच्याच साक्षीने अनेक सणं, निमित्त साजरी झालीत. आज तिची जागा सुजाता घेत आहे. दुःख-आनंद असा हा प्रसंग आहे. तिच्या प्रदीर्घ सेवेबद्ददल मनापासून आभार! थँक यु जेपान द मिक्सर! होय, मी Jaipan Mixer विषयी बोलत आहे. अठरा वर्षापूर्वी ती आमच्या घरात वाजत गाजत आली. २३ मे २००४ मध्ये माझ्या लग्नात पत्नीच्या एका जवळच्या नातेवाईकाने आंदन स्वरूपात तिला भेट (माझ्याकडील नातेवाईकांनी ताट, गंज, स्टीलचा डबा तत्सम वस्तूच भेट स्वरूपात दिल्या. त्याबद्दल मी त्यांचा फार ऋणी आहे.) दिली. हळुवार तीने स्वयंपाकघरात आपले बस्तान बसवले. किरायाची खोली ते स्वतःचा घर अशा प्रवासात ती आमच्या सोबत कायम राहिली. जेव्हा आम्ही घर बांधायला सुरूवात केली तेव्हाच माझ्या...