जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट
जयंती: वर्तमानाला सत्याची ओळख करून देणारा चित्रपट चित्रपट नेहमीच भारतीय समाजाला भूरळ पाडत आला आहे. लहानमोठ्यांचा हा आवडीचा विषय. प्रेमकथांची भरमार असणाऱ्या भारतीय सिनेमात राज कपूर यांनी काही हिंदी चित्रपटांमधून समाज वास्तव मांडले आहे. सलीम-जावेद जोडीने बदलत्या जमान्यानुसार डॕशींग हीरोपटाच्या कथा लिहिल्या. सत्यजीत रे, श्याम बेनेगल, राकेश मेहरा, मेहमुद यांनी नवे काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेकडो वर्षाचा इतिहास असलेल्या भारतीय हिंदी चित्रपट विश्वाला असे बोटावर मोजता येईल, एवढेच नावं सांगता येणे, ही आपल्या सिनेमाची शोकांतिका आहे. काळानुसार बदलने जीवंतपणाची लक्षण आहे, पण हिन्दी सिनेमा मात्र सडक्या पाण्यात तरंगत राहिला. काहिंनी या भिंती तोडून नदीसारखे प्रवाहित होण्याचा प्रयत्न केला. आज नवनव्या प्रयोगांसह समाजवास्तव घेऊन चित्रपट येताहेत, पण ते प्रादेशिक आहेत. तमीळ, मराठी मधून आशादायक चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'जयंती' नावाचा मराठी चित्रपट जीवंतपणा देणारा असा आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षाच्या निर्बंधानंतर...