Posts

Showing posts from July, 2021

स्वामी विवेकानंद यांचे गौतम बुध्दांविषयीचे विचार

Image
  स्वामी विवेकानंद यांचे गौतम बुध्दांविषयीचे विचार                  स्वामी विवेकानंद म्हटले की धर्म आणि धर्माभिमान असा अर्थ आपल्या डोळ्यापुढे उभा ठाकतो. असा संकुचित विचार निर्माण होण्यामागे अर्थातच तथाकथित तत्वचिंतक, विचारवंत, एकांगवादी धार्मिक अंध भक्त यांचा हात आहे. यांच्या साचेबध्द वैचारिक प्रसारामुळे खरे स्वामी विवेकानंद आम्हाला कळलेच नाही वा कळू दिले नाही. खऱ्या  सनातन धर्माचा प्रचार-प्रसार हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असताना स्वामी विवेकानंदांच्या विचारांची सत्यता मात्र भारतीय समाजात पोहोचू शकली नाही, हे त्यांचे आणि आमचेही दुर्दैवच म्हणावे लागेल. आपापल्या सोईने भारतीय धर्मांच्या विचारांचे अपभ्रंश अनुयायांमार्फतच होत राहिले आहे. आपणांस पटेल, रुचेल ते प्रिय. त्याचेच अनुकरण करायचे. मग जरी आपल्या खऱ्या धर्मात नसेल तरी ते समर्थनीय ठरते. पुढे त्याच गोष्टी धर्माचा भाग बनत गेल्या. 'जतो मत, ततो पथ' म्हणजेच सर्वच धर्ममत ईश्वराप्रत पोहोचतात, अशी रामकृष्ण परमहंसांनी धर्माची व्याख्या केली होती.  स्वामी विवेकानंद यांनी या विचारांचा...

प्रेमानंतर....

Image