लाॕकडाऊन आणि गच्ची

लाॕकडाऊन आणि गच्ची संपूर्ण विश्वालाच जागच्या जागी थांबवून आपली घौडदौड सुरू ठेवणारा कोरोणा आज मानवजातीचा नंबर एकचा दुश्मन झालाय. मानवी आतंकवाद वगैरे याच्यापुढे काहीच नाही. सध्या जगात याचेच आतंक माजले आहे. अशा या कोरोना (कोवीड१९) विषाणूने सगळ्यांना घरात बंदिस्त करून टाकले आहे. सध्या या विषाणूवर सामाजिक अंतर हाच एकमेव जालीम उपाय आहे. परिणामतः लोकांना लाकडाऊनला सामोरे जावे लागले. लाकडाऊनचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे दिवासभरातील तोचतोपणा अधिक कंटाळवाणा होत आहे. असे असले तरी कामाच्या व्यापामुळे, व्यस्ततेमुळे जे करता येत नव्हते ते करता येत आहे. जवळ असूनही जे बघता येत नव्हते ते बघता येत आहे. संपूर्ण कुटुंबाला अख्खा दिवस एकत्र घालवता येणे शक्य होत आहे. अशा सकारात्मक बाबीही या लाकडाऊनमुळे जुळून आल्यात. गच्ची....जी सगळ्याच घरांची शान, पण दुर्लक्षित अशी जागा. आता ही गच्ची अधिक प्रिय झाली आहे. वर्षभरातून उन्हाळ्यात पापड, वड्या, चिप्स इ. वाळवण्यासाठी गच्चीव...