लग्नमुहूर्त आणि तापमान वाढ
लग्न मुहूर्त आणि तापमान वाढ
लग्न....! सर्वांच्याच(काही अपवाद सोडून) आयुष्यातील महत्वाची घटना. आपण भारतीयांमध्ये तर विवाहसंस्थेला जन्मोजन्मीचं बंधन वगैरेही मानतात. ज्या घरी लग्न ठरलेला असतो, त्यांच्यासाठीच नव्हे तर मित्र मंडळी, नातेवाईकांसाठीही आनंदाची पर्वणी असते. ग्रामीण भागात तर संपूर्ण गावाला हा सोहळा आपल्या घरचाच वाटतो. पूर्वी बैलगाड्यांनी वऱ्हात निघायची. हा प्रवास मजेदार असायचा. बैलगाड्यांची लांबच लांब रांग बघून प्रवासातील रस्त्यातल्या गावकऱ्यांमध्ये कुजबूज चालायची, "बडी असामी दिसतेय." विचारपूस व्हायची. पाणी पाजायचे, काहीजण तर चहाही. जर पुढून एखादी दुसरी वऱ्हात आली तर दोन्ही नवरदेव एकमेकांना सुपारी देत असत. (जणू ते एकमेकांना सांगत असावेत, की आपण सुपारी आणि बायको आडकीत्ता. हा गंमतीचा भाग सोडा, पण असे चांगले रीवाज आज लयास जात आहेत.) अशा हर्षोउल्हासात वऱ्हातीचं वधू गावी आगमन व्हायचं. जाणवसा असलेल्या घरून चिवडा वगैरे (बहुतेक चिवडाच असायचा) खावून सोबत आलेल्या डफरेवाल्यांच्या वाज्यात नाचत वऱ्हाडी नवरदेवासह वधूमंडपी मोठ्या थाटात पोहोचायचे. आज दळणवळणाच्या खूप सोई उपलब्ध असल्याने बैलगाडी वगैरे तर नाहीच. बाकी थोड्याफार फरकाने पूर्वीसारखचे असले तरी अनेक बाबी बदलत आहेत.
साखरपुडा
मुलगा आणि मुलीने एकमेकांना पसंती दिली त्यांच्या कुटुंबीयांकडील लोक साखरपुडा हा विधी करतात. लग्न ठरले हे साखरपुड्याने नक्की होते. या विधीला 'कुंकू लावणे' असेही म्हणतात. वरपिता मुलीला कुंकू लावून साडी-चोळी व नारळ देतो आणि या शुभप्रसंगी तोंड गोड करण्यासाठी साखर देतो. म्हणून या विधीला 'साखरपुडा' असे नाव प्राप्त झाले आहे. हल्ली 'सगाई' हा प्रकार अनेकांना ठाऊक आहे. यावेळी नियोजित वर आणि वधू एकमेकांना अंगठी घालतात. हाही साखरपुड्याचाच प्रकार.
सत्य शोधक विवाह पध्दती - क्रांतिकारक विचार पध्दती
कुटुंब, व्यक्तिगणिक विवाहपद्धती भिन्न असते. पूर्वी वैदिक आणि इतर पध्दतीने विवाह लावले जायचे. आपापल्या श्रध्दांनुसार विवाह पार पाडले जाते. काही विवाह लावण्याच्या पध्दतीत तर श्रध्दांपेक्षा जास्त अंधश्रध्दाच आढळून येते. हा सर्व विचार करता म. ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक विवाह पध्दतीत अधिक डोळसपणा दिसतो. येथे रूढ पध्दतींना अवहेरुन साधी पध्दत अवलंबली गेली. म. फुले म्हणतात, ''वधु-वराचे जातीस नीच, हलकट मानना-या धुर्त, कपटी आर्य-भटाची या कामी सावली सुद्धा पडु देऊ नये. म्हणजेच बामन, पुरोहित अर्थात, कर्मकांड गायब. म्हणजे देवकुंडी नको, मारोती नको.” भारतात २५ डिसेंबर १८७३ रोजी पहिला सत्यशोधक विवाह म.फुले यांनी घडवुन आणला. पुरोहिताशिवाय लावलेला हा विवाह क्रांतिकारकच ठरला.
सत्यशोधक पध्दतीत अक्षदा म्हणून धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या वाटाव्यात. म. फुले यांनी लिहिलेलीच मंगलाष्टके म्हणावे. वधु आणि वराच्यामध्ये अंतरपाट धरुन म. फुले यांनी लिहिलेल्या मंगलाष्टकांचे गायन केल्यानंतर वधु आणि वरास शपथ द्यावी. अशी ही सोपी विवाह लावण्याची पध्दती आहे. या पध्दतीजवळ जाणारी पध्दत म्हणून नवबौध्दांच्या विवाह पध्दतीचा उल्लेख करावा लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दिक्षा दिल्यानंतर ही विवाह पध्दती सुरू झालेली दिसते. यापूर्वी हिंदू विवाह पध्दतीच प्रचलित होती. तिला सर्वप्रथम छेद दिले ते म. फुले यांनी. जुन्या रितींचा प्रभाव आजही ओसरलेला नाही. काही सुधारणावादी मंडळी सत्य शोधक पध्दतीने विवाह लावत आहेत. हे प्रमाण फार अल्प आहे. म. ज्योतिबा फुले यांचे क्रांतिकारक विचार आजही पचनी पडत नाही याचे हे द्योतक आहे.
विवाहः काल आणि आज
लग्न दोन जीवांचे मिलन असून लग्नगाठीचे बंधन हे पवित्र बंधन मानले जाते. एकमेकांच्या सुख-दुःखात समान वाटेकरी होऊन आयुष्यभर साथसंगत करत करण्याचे वचन एकदुसऱ्यांना दिले जाते. भारतात जेवढे विवासंस्थेला महत्व आहे तेवढे जगात अन्यत्र अभावानेच पहायला मिळते.
स्वातंत्र्यपूर्व काळाचा विचार केला तर भारतीय समाजव्यवस्थेला अनेक कुप्रथांनी ग्रासले होते. त्यात विवाह हे सुध्दा एक होते. भारतीय समाजव्यवस्था अनेक जाती, जमाती, संप्रदाय, धर्म इ. वैशिष्ट्यांनी युक्त असल्याने विवाहाचे अनेकविध प्रकारही होते. अनुलोम विवाह (वरच्या वर्णाचा पुरुष आणि खालच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह), प्रतिलोम विवाह (खालच्या वर्णाचा पुरुष आणि वरच्या वर्णाची स्त्री यांचा विवाह), वैदिक लग्न, कोर्ट मॅरेज, प्रेमविवाह, सजातीय विवाह, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, अनुरूप विवाह, विजोड विवाह, सगोत्र विवाह, विधवा विवाह, पुनर्विवाह, जरठ विवाह, जरठ-कुमारी विवाह, पाळण्यातले लग्न, बालविवाह, गांधर्व विवाह, राक्षस विवाह, पाट, म्होतूर, वैधानिक विवाह, निकाह उर्फी ,एकपत्नीत्व, बहुपत्नीत्व, समलिंगी विवाह यापैकी अनेक प्रकार कालबाह्य झाल्याने ते संपुष्टात आले. विवाहासंबंधी अनेक चालीरीती रूढ होत्या. पुढे इंग्रजी शिक्षण व पाश्चात्त्य विचारांच्या प्रभावाने अनेक समाज सुधारक व विचारवंतांनी याविरुध्द आवाज बुलंद केला. सती प्रथासारखी जीवाघेणी प्रथा बंद झाली.
हे झाले १००-१५० वर्षापूर्वीचे. वर्तमानात विवाहाच्या रुढ पध्दतीसोबत लिव इन रीलेशनशीप हा पाश्चात्त्य प्रकार शहरात रूढ होऊ पाहत आहे. उघडपणे अनेकजन हे स्विकारतही आहेत. विवाह न करता परस्पर संमतीने एकत्र राहणे, शरीरसंबंधासह. पटले तर ठिक नाही तर मार्ग मोकळे, असा नवीन प्रकार. अलिकडे तर समलिंगी विवाह देखील होऊ लागली आहेत. जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही; तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिला नाही. समलिंगी विवाहाला सर्वप्रथम २००१ साली नेदरलँड्सदेशामध्ये मान्यता दिली गेली. एकंदरीत विवाह हे बहुपदरी संबंधाचे माध्यम बनले आहे. असे असले तरी विवाहाचे ठरवून म्हणजे मुलगा व मुलीच्या कुटुंबियांमार्फत ठरवून केलेल्या विवाहाला अधिक पसंती व मान्यता आहे. कुटुंबाच्या माध्यमातून विवाहसंबंध हे अधिक बळकट होऊ शकतात. त्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रयत्नही करतो.
असाही एक जमाना होता की विवाहाला वंशप्राप्तीचे साधन मानत. आज वंशासाठी विवाहाची गरजच उरली नाही. विवाह न करताही पुत्रप्राप्ती होऊ शकते. करण जोहर, तुषार कपूर, शाहरुख खान(तिसरा मुलगा), आमिर खान (तिसरा मुलगा)या बालिवूडच्या हिरोंनी या नव्या विज्ञानाधारीत प्रयोगाद्वारे पुत्र प्राप्ती केली आहे. मुद्दा हा की, विवाहाकडे आज बदलत्या मानसिकतेतून बघावे लागेल.
वाढत्या तापमानामुळे लग्नहंगाम का बदलू नये ?
पूर्वी लग्न काही दिवसांचा उत्सव असायचा. लग्नाच्या दोन-तीन दिवसा आधीच पाहुण्यांचे आगमण व्हायचे. लग्नानंतर नवरदेवाकडून गावजेवन दिल्या जायचे. नवरी नेणे आणणे, यात तीन-चार दिवस लागायचे. मांडव वाढवण्याचा प्रकार असायचाच. जवळच्या नातेवाईकांना नाॕनवेज खाऊ घालायचे. अशाप्रकारे हा लग्नसोहळा पार पडायचा. हल्ली समाजव्यवस्थेने एवढा वेग पकडला आहे की, सारे झटपट होऊन जाते. ते योग्यही आहे, कारण पूर्वीपेक्षा अधिक सोई निर्माण झाल्या आहेत. पैसा दिला की, हाॕल, जेवन सारे काही सहजपणे उपलब्ध होते. प्रवासासाठी तर कार, बस, ट्रॕव्हल्स, ट्रेन पासून तर विमानासारख्या वाहनांचा लग्नात वापर होत आहे. यामुळे खूप वेळ वाचलाच तद्वतच सोईचेही झाले. हे सगळे बदलत असताना जागतिक हवामानातही बदल होत आहेत. प्रत्यक्ष याचे चटके आता बसू लागले आहेत.
जागतिक हवामानाचा आणि लग्न कार्याचा काय संबंध ? असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आपला भारत कृषिव्यवस्थेवर आधारीत देश. पावसाळ्यातील पीक उभे राहिले, मशागत होऊन धान्य घरी आले की शेतकऱ्यांचे काम संपायचे. पिकांचा हंगाम झाल्यानंतर सर्व ग्रामीणजण निवांतच. असा हा काळ म्हणजे उन्हाळा. याच काळात लग्न मुहूर्त काढले जातात. कारण सर्वांकडेच मोकळा वेळ असायचा. सर्व नातेवाईक एकत्र येण्याचे लग्नसोहळा हे,माध्यम होते आणि आहेही. उन्हाळ्यातील एप्रील - मे महीना म्हणजे लग्नसराईचा. असा पायंडाच पडला. दुसरे एक कारण म्हणजे मुलांना असणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्या. संपूर्ण कुटूंबच लग्नाला जाता येईल असा हा काळ, पण आज बदलत्या हवामानाचा विचार करता हा काळ लग्न ठरवण्याच्या दृष्टीने माझ्या मते योग्य नाही. वेगाने तापमानवाढीची पूर्वीच्या वातावरणाशी तुलनाच होऊ शकत नाही. पावसाअभावी दुष्काळ पडलाही असेल, पण उन्हाळ्याची दाहकत आजच्या एवढी नव्हतीच. ४५ं ते ४७ं डीग्रीपर्यंत जाणाऱ्या तापमानात वऱ्हातीतील बापडे आणि म्हाताऱ्या जिवांचे काय हाल होत असतील? वरून वेळेत न येऊनही नाचण्यापायी उशीरा लागणारी लग्ने!
दोन तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे. आष्टी येथे माझ्या परिचिताच्या मुलीच्या लग्नाला सहपरीवार गेलो होतो. लग्न होता सायंकाळी ५.४५ वाजता. आता नेहमीप्रमाणे अर्धा एक तास उशीरा लग्न लागेल, या हिशोबाने अर्धा तास उशीराच गेलो. भव्य पटांगणात भव्य शामीयाना उभारलेला, त्यात मात्र कोणीच नाही. पंखा वगैरे सुरू करुन तिथे बायको व मुलांना बसवून मी ओळखीच्या व्यक्तींशी बाहेर गप्पांमध्ये मश्गूल झालो. माझा लहान मुलगा थोड्या थोड्या वेळाने माझ्याकडे येऊन घुटमळू लागला. एक तास झाला दोन तास झाले. आता मात्र मुलाला भूक लागल्याने तो जेवनासाठी व झोपण्यासाठी त्रास देवू लागला. रात्रीचे ९ वाजले तरी लग्न मंडपात वऱ्हात पोहोचली नाही. नवरदेव जानवसा घरी येथे पोहोचला असे कळले. म्हणजे नाचत येण्यासाठी किमान एक तास तर लागेलच. लग्न लागेपर्यंत एक तास. एकूण दोन तास थांबावे लागेल. म्हणजे ११वाजेपर्यंत, हे शक्यच नव्हते. शेवटी लग्न न लावताच आम्ही सहपरीवार माघारी फिरलो. रस्त्यातल्या धाब्यावर जेवण करून घरी परतलो. लग्नसोहळ्याचे अशा प्रकारचे अनुभव सर्वांना येत असतात. लग्न उशीरा लागणे हे तर काॕमन होत चालले आहे. मी आज दि. २६ मे ला रस्ताने जात असताना भर उन्हात वऱ्हात चालली होती. घामाघूम होऊन चाललेल्या त्या लोकांना बघूनच आजच्या लग्न मुहूर्ताविषयी लिहावे असे वाटले. तर सांगायचे हेच आहे की, शेतकऱ्यांच्या मोकळ्या वेळेला ध्यानात घेऊनच उन्हाळ्यात लग्न ठरवले जात असावे, असे मला वाटते. आज सगळ्या सोई असल्याने एका दिवसात लग्न लावून माणूस घरी पोहोचतो. दोन दिवस थांबणे चांगले असले तरी सगळेच एवढे व्यस्त आहेत की, नातेवाईकांना थोडा वेळ द्यायलाही वेळ नाही.
उन्हाळ्याच्या या तापत्या भट्टीत लग्नकार्य करण्यापेक्षा दिवाळीच्या काळात ( मुलं, शिक्षक व अनेकांनाही सुट्या असणारा हंगाम) लग्न करण्याचे ठरविले तर उन्हाळ्याच्या दाहापासून वाचता येईलच, पण गारवायुक्त प्रसन्न हवामानामुळे सगळ्यांना लग्नसोहळ्याचा आनंद लुटता येईल. वर म्हटल्याप्रमाणे प्रवास वेगवान झाल्याने ग्रामीण भागातील व्यक्तीही लग्न लावून आपल्या शेतीच्या कामावर परतू शकतो. वर्तमानात खेड्यातही सगळ्या सोई असल्यामुळे तेथील लग्नही कमी दिवसात पार पडतात. वेळेचा अपव्यय होत नाही. त्यामुळे शेतकरी शेतीचा हंगाम सांभाळून (खरं म्हणजे दिवाळीच्या काळात पीक उभा असतो, फारसे काम नसतातच. पण हो, आर्थिक अडचण असते.) लग्नकार्य पार पाडू शकतात.
बघा, विचार करून. बदलत्या परिस्थितीनुसार (सामाजिक, आर्थिक तथा हवामान) नवे काही सुरू करायलाच हवे. शेवटी लग्न आनंदाचा सोहळा आहे. मग तो आनदातच संपन्न व्हायला हवा. वाढता तापमान या आनंदात विरजन टाकून विघ्न निर्माण करतो असे वाटत नाही का ?
निष्कर्ष
लग्नगाठी जुळल्यानंतर दोन व्यक्ती वा दोन कुटुंबच नव्हे तर फार मोठा समाज या लग्न कार्यात सामील होत असतो. असे असेल तर या सर्वांच्या सोईचाही विचार करणे वधू - वरांसाठी क्रमप्राप्त ठरते. फक्त एका हाॕल किंवा लॉनमध्ये लग्न लावून जेवन देणे याही पलिकडे विचार करणे गरजेचे आहे. यावर्षी तर ५० डिग्रीपर्यंत तापमानाने मजल मारली. अशा या गर्मीत लग्नाला जाणे दिव्यच होऊन बसले. शेवटी नातेसंबंध, मित्र, परिचित यासर्वांना टाळताही येत नाही. लग्नाला जावेच लागते, उन्हाचा त्रास झाला तरी. केव्हा न केव्हा यासंबंधी गंभीरपणे निर्णय घ्यावाच लागेल. या निरंतर तापत्या उन्हामुळे लग्नसोहळा त्रासदायक करायचा की आनंददायी ? याचा सर्व संबंधितांनी जरूर विचार करावा.
जगात अस्तित्वात असलेल्या मोजक्या संस्कृतींपैकी एक भारतीय संस्कृती आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार आपल्या वैशिट्यांसह संस्कृती अस्तित्वात येतात व वाढतात. काळाच्या प्रवाहात व बदलत्या भौगोलिक स्थितंत्यरामुळे अनेक संस्कृती नष्टही झाल्या. अर्थात त्या कमकुवत असल्यानेच संपल्या. आपली भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून टिकून आहे. यातच तिचे थोरपण दडले आहे. याच संस्कृतीमधील विवाह फार महत्वाची संस्था असून तिच्या मुहूर्तकाळात बदल करण्याची आज गरज आहे. अनेक वर्षांच्या 'लग्नसराई'शी विशिष्ट ऋतूचा जोडलेला संबंध हल्ली तापदायक ठरत असल्याने नवकाळाची सुरुवात करावी लागेल. तसे होईल अशी आशा आहे.
अरुण व्ही. लाडे
***********************************

Comments
Post a Comment