Posts

Showing posts from August, 2021

कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं

Image
कोसळणारा पाऊस आणि अफगानीस्तानातील भावंडं            आज दि. १६ आगष्ट २०२१. कालच आपण सारे भारतीय आपला ७५ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा केला. आज अफगानिस्तान संपूर्णपणे तालिबानच्या कब्ज्यात आल्याची बातमी टि.व्ही.वर पाहिली. एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद साजरा होतोय तर दुसरीकडे स्वातंत्र्य गेल्याचा. गेली २० वर्षे अफगानीस्तानात लोकशाही सरकार होते. ते आज पुन्हा संपुष्टात आले. लोकशाही पुरस्कृत देश हे भारताला अधिक प्रिय. कारण जगातील  सर्वात मोठी लोकशाही आपल्याच देशात नांदत आहे. ही पार्श्वभूमी असल्याने सारेच लोकशाहीला मानणारे देश आपले मित्रच. असे असले तरी अफगानीस्तान आणि आपले नाते फार जुने. एकेकाळी अफगानीस्तान मौर्य साम्राज्याचा समाविष्ट होता. म्हणजे विशाल अखंड भारताचा भाग असलेला अफगानीस्तान या दृष्टीनेही आपल्याला जवळचा वाटतो. या जवळीकतेला   मात्र दहशतवादी संघटनांद्वारे फट पाडण्याचा नेहमीच प्रयत्न होत गेला. ही जवळीकता अधिक घट्ट होत असतानाच अमेरिकेतील सैन्यानी अफगानीस्तानातून काढता पाय घेतला आणि तिथले वासे फिरले. तालिबानने अवघ्या दोन महिन्यात संपूर्ण अफगान...